logo-image

सैनिकी सेवापूर्व संस्था प्रवेश परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे काही प्रश्न आणि उत्तरे…

Best Course For SPI Aurangabad Exam 2021 Disha Foundation.

सैनिकी सेवापूर्व संस्था प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम आणि  परीक्षा पद्धती काय आहे?
सैनिकी सेवापूर्व संस्था प्रवेश परीक्षेसाठी वेगळा असा काही अभ्यासक्रम दिला गेलेला नाही.  इयत्ता आठवी इयत्ता नववी आणि इयत्ता दहावी या तीन वर्गांच्या स्टेट बोर्ड आणि सीबीएससी अभ्यासक्रमावर आधारित  प्रश्नपत्रिका  असते.  त्यामध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी, सामाजिक शास्त्र, चालू घडामोडी  व  बौद्धिक चाचणी परीक्षेचा समावेश असतो.



सैनिकी सेवापूर्व संस्था प्रवेश परीक्षा कुठे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना देता येते?
पूर्वपरीक्षा ही एका  दिवसाची असते.  मागील वर्षीपासून पूर्व परीक्षा महाराष्ट्रात आठ  केंद्रांवर घेण्यात आली. ज्यामध्ये  मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अकोला  आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. .
महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेले आणि यावर्षी इयत्ता दहावी मध्ये शिकणारे स्टेट बोर्ड सीबीएससी आय सी एस सी  इत्यादी विद्यार्थी  या परीक्षेसाठी पात्र असतात.  म्हणजेच ही परीक्षा विद्यार्थ्याला आयुष्यात फक्त एकदाच देता येते.

परीक्षेचा पेपर  कसा असतो?
पूर्वपरीक्षेच्या पेपर मध्ये दीडशे प्रश्न असतात.  त्यापैकी 75 प्रश्न गणित व इतर 75 प्रश्न इंग्रजी, विज्ञान, समाजशास्त्र,  चालू घडामोडी  बौद्धिक चाचणी परीक्षेसाठी राखीव असतात. सैनिकी सेवापूर्व  संस्थेची प्रवेश परीक्षा बहुपर्यायी अर्थात ऑब्जेक्टिव स्वरूपाची आहे. यामध्ये प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेली असतात. त्यापैकी योग्य पर्याय विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत नोंदवायचा असतो.  प्रत्येक प्रश्नाला एक मार्ग असतो तसेच प्रत्येक दोन चुकीच्या  उत्तरा मागे एका प्रश्नाचे मार्क वजा होतात.  निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम या परीक्षेला अवघड बनवते. 




निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आपण काही  उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊ

Solved
Questions
out off 150
Right
Answers
Wrong
Answers
Negative
marks
Final
Marks
Conclusion
Student 1 60 56 2 1 55 Not Selected
Because Less
Marks
Student 2 95 89 6 2 88 Higher Chances
to Get Selected
Student 3 140 96 44 22 74 May Not Be Selected
because of
Negative Marks

ही परीक्षा केवळ मुलांच्या अभ्यासाची नसून त्यामध्ये वेळेचे नियोजन, प्रश्नांची निवड आणि रिस्क मॅनेजमेंट याची ही कसोटी लागते.

सैनिकी सेवापूर्व संस्था प्रवेश परीक्षेचा अभ्यास कसा करावा?
 सैनिकी सेवापूर्व संस्थेची प्रवेश परीक्षा ही कठीण परीक्षा आहे.  सोबतच विद्यार्थ्यांना दहावी बोर्डाचा अभ्यास,  शाळा, क्लासेस, स्पोर्ट्स  अशा बऱ्याच गोष्टींमुळे परीक्षेच्या अभ्यासाला पुरेसा न्याय देता येत नाही.  विद्यार्थ्यांनी दहावीच्या वर्षी रोज दोन तास या परीक्षेसाठी सराव केल्यास ही परीक्षा पास होण्याची शक्यता बळावते.   परंतु विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेच्या तणावामुळे बऱ्याच वेळा ते शक्य होत नाही.  त्यामुळे दिशा फाउंडेशन  तर्फे विद्यार्थ्यांसाठी विकेंड बॅचेस ज्या केवळ शनिवार आणि रविवार दोनच दिवस आणि रोज तीन तास प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये  लेखी परीक्षा व इंटरव्ह्यूची तयारी करून घेण्यात येते. 
याशिवाय विद्यार्थ्यांनी रोज वर्तमानपत्र वाचन आणि टीव्ही वर  महत्त्वाच्या बातम्या बघणे अपेक्षित आहे.



पूर्व परीक्षेचा निकाल कधी लागतो?
पूर्व परीक्षेच्या नंतर  साधारण एक महिन्यानंतर निकाल  कधीही लागू शकतो.  निकाला मधून 300 सर्वाधिक मार्क  मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.  त्यासाठी  आवश्यक त्या सूचना वेळोवेळी संस्थेच्या वेबसाईट वरती प्रसिद्ध केल्या जातात.  


सैनिकी सेवापूर्व संस्थेच्या मुलाखतीचे स्वरूप कसे असते?
सैनिकी सेवापूर्व संस्थेच्या मुलाखती या निवृत्त लष्करी अधिकारी, संस्थेचे संचालक मंडळ यांच्या मार्फत घेतल्या जातात.  त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त,  त्यांच्या आवडीनिवडी, सामान्य ज्ञान,  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील चालू घडामोडी,  नजीकच्या काळात घडलेल्या महत्त्वाच्या घटना,  विद्यार्थ्यांच्या आजपर्यंतच्या आयुष्यातील अचीवमेंट  यावर आधारित प्रश्न विचारले जातात.  मुलाखत साधारण पंधरा मिनिटे ते अर्धा तास चालते. मुलाखत ही मुख्यतः इंग्रजी भाषेत होते पण तरी विद्यार्थी काही प्रश्नांसाठी हिंदी अथवा मराठीचा उपयोग करू शकतात.   




सैनिकी सेवापूर्व संस्थेच्या मुलाखतीनंतर पुढील प्रक्रिया काय असते?
मुलाखतीनंतर अंतिम निवड झालेल्या साठ विद्यार्थ्यांची यादी संस्थेच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येते.  याशिवाय 40 विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट ही प्रकाशित करण्यात येते.    
विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी विहित कालावधी मध्ये,  मागविण्यात आलेल्या कागदपत्रांसह संस्थेमध्ये  प्रवेश निश्चित करायचा असतो.  एन डी ए  परीक्षेच्या तयारीत सोबतच अकरावी आणि बारावी  महाविद्यालयीन शिक्षण  सैनिकी सेवापूर्व संस्थेने सुनिश्चित केलेल्या महाविद्यालयांमध्ये होते.  त्यासाठी संपूर्ण  जबाबदारी ही सैनिकी सेवापूर्व संस्थेची असते.  






Request Call Back