logo-image

सैनिकी सेवापूर्व संस्था (SPI) विषयी माहिती

Best Course For SPI Aurangabad Exam 2021 Disha Foundation.

इसवी सन 1954 मध्ये महाराष्ट्रातील पुणे शहरामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी ची स्थापना झाली.  सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रातील अगदी नगण्य विद्यार्थी या देशातील सर्वोच्च संरक्षण शिक्षण प्रबोधिनीमध्ये असायचे. त्यामुळे नॅशनल डिफेन्स अकॅडमी महाराष्ट्रात होती पण महाराष्ट्र नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये नव्हता अशी परिस्थिती निर्माण झाली.

महाराष्ट्रातील अधिकाधिक विद्यार्थी संरक्षण सेवेमध्ये अधिकारी व्हावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने सैनिकी सेवापूर्व संस्था, औरंगाबाद ची स्थापना केली. गेली जवळपास पन्नास वर्षे ही संस्था महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नॅशनल डिफेन्स अकॅडमी च्या प्रवेशासाठी मार्गदर्शन करत आहे. आजवर पाचशेहून अधिक विद्यार्थी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. त्यामुळे संरक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एस पी आय हाच सर्वोत्कृष्ट पर्याय आहे.

दरवर्षी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होतात त्यातला केवळ तीनशे विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते आणि अंतिमतः 60 विद्यार्थ्यांची निवड प्रशिक्षणासाठी होते. दोन  वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर विद्यार्थी एनडीए प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरतो आणि परीक्षेत पास होण्याची त्याची शक्यता वाढते.

एस पी आय प्रवेश परीक्षा  ही महाराष्ट्रातील मानाच्या परीक्षा पैकी एक आहे. बरेच  विद्यार्थी  काही वर्ष आधीपासूनच या परीक्षेची तयारी सुरू करतात तर काही विद्यार्थी वर्षभराच्या मेहनतीवर सुद्धा या परीक्षेत यश मिळवतात.

एस पी आय  संस्थेमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचे आयुष्य एका निश्चित ध्येयाच्या दिशेने वाटचाल करते. केवळ  नॅशनल डिफेन्स अकॅडमी नाही तर आय ए एस, आयपीएस यांसारख्या नागरी सेवा परीक्षेत तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील उच्च करिअरसाठी  येथील विद्यार्थी पात्र ठरतात.

महाराष्ट्रातील अधिकाधिक पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये  सैनिकी सेवापूर्व संस्था प्रवेश परीक्षा बद्दल जागृती आणि रुची वाढत आहे.  त्यामुळे दरवर्षी परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काहीशी वाढताना दिसते. यावर्षी पासून तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये मुलींनाही प्रवेश देण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत.  त्यामुळे भविष्यात आपल्याला सैनिकी सेवापूर्व संस्थेमध्ये मुलींसाठी सुद्धा प्रवेशाची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्रातील संरक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सैनिकी सेवापूर्व संस्था एक उत्तम मार्गदर्शक पर्याय आहे.  सैनिकी सेवापूर्व संस्था प्रवेश परीक्षा तयारीसाठी दिशा फाउंडेशन गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे.

दिशा फाउंडेशन विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा, इंटरव्यू  मार्गदर्शन, स्टडी मटेरियल, टेस्ट सिरीज अशा अनेक उपक्रमांमधून मार्गदर्शन करत असते.

मागील वर्षी  सैनिकी सेवापूर्व संस्थेच्या प्रवेश परीक्षेमध्ये पास होऊन ईंटरव्हूसाठी बोलावले गेलेल्या तीनशे विद्यार्थ्यांमध्ये  दिशा फाउंडेशनच्या बत्तीस विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले. हा महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट निकाल आहे.

यावर्षी सुद्धा आम्ही शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षेत आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना मुलाखतीमध्ये यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आमचे तज्ञ मार्गदर्शक, अनुभवी प्राध्यापक, परीक्षा तज्ञ, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, इंटरव्यू टीम व इतरही अनेक जण यासाठी वर्षभर प्रयत्न करत आहेत.

सैनिकी सेवापूर्व संस्थेत प्रवेश मिळणं हे जर तुमचे ध्येय असेल आमची संस्था निश्चितच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम आहे.

धन्यवाद…!जय हिंद... जय महाराष्ट्र…!
आपला विश्वासू
संचालक, दिशा फाउंडेशन,
औरंगाबाद, महाराष्ट्र.


Request Call Back